2021 मध्ये घराचं स्वप्न पूर्ण! महाराष्ट्रात 15 लाख घरांची विक्री

Home
Homesakal media

मुंबई : कोरोनामुळे (corona) सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले (Financial problems) असतानाच यंदा राज्यात घर खरेदीला (home purchasing) ग्राहकांचा मोठा प्रतिसाद (huge consumer interest) लाभला आहे. जानेवारी ते डिसेंबर 2021 या वर्षात राज्यात तब्बल 15 लाख 11 हजार 984 घरांची विक्री (More than fifteen lac home sold out) झाली आहे. तर मार्च महिन्यात सर्वाधिक म्हणजे 2 लाख 13 हजार 476 घरांची विक्री झाली आहे. तसेच मुंबईमध्ये (Mumbai) 1 लाख 11 हजार 845 घरांची विक्री झाली आहे. (More than fifteen lac home sold out in year 2021 in Maharashtra)

Home
मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा, धारावीत एकाच दिवशी ३४ कोरोना रुग्ण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला होता. गृहनिर्माण क्षेत्राला गती देण्यासाठी राज्य सरकारने सप्टेंबर ते डिसेंबर 2020 पर्यंत मुद्रांक शुल्कात 3 टक्केची सूट दिली. या कालावधीत राज्यात मोठ्या प्रमाणात घर खरेदी झाली. त्यामुळे विकासकांनी मुदत संपुष्ठात येताच सवलतीला मुदतवाढ देण्याची मागणी लावून धरली. त्यामुळे राज्य सरकारने 1 जानेवारी ते 31 मार्च 2021 पर्यंत मुद्रांक शुल्काचा 3 टक्के दर लागू केला. मुद्रांक शुल्कात सवलत आल्याने राज्यातील मोठ्या रक्कमेची घरे खरेदी करण्यास भर दिला.

नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार जानेवारी महिन्यात 1 लाख 51 हजार 155 घरांची राज्यात विक्री झाली. फेब्रुवारीमध्ये 1 लाख 51 हजार 155, मार्च महिन्यात 2 लाख 13 हजार 476, एप्रिल महिन्यात 94 हजार 844, मे महिन्यात 66 हजार 631, जून महिन्यात 1 लाख 45 हजार 526, जुलै महिन्यात 1 लाख 36 हजार 459, ऑगस्ट महिन्यात 1 लाख 05 हजार 598, सप्टेंबर 97 हजार 882, ऑक्टोबर 1 लाख 6 हजार 986, नोव्हेंबर 1 लाख 04 हजार 14 आणि डिसेंबर महिन्यात 1 लाख 37 हजार 005 घरांची विक्री झाल्याची नोंद झाली आहे.

तर मुंबई शहरात जानेवारी महिन्यात 10 हजार 411, फेब्रुवारी 10 हजार 172, मार्च 17 हजार 728, 10 एप्रिल 135, मे 5 हजार 360, जुन 7 हजार 856, जुलै 9 हजार 822, ऑगस्ट 6 हजार 784, सप्टेंबर 7 हजार 804, ऑक्टोबर 8 हजार 576, नोव्हेंबर 7 हजार 582 आणि डिसेंबर महिन्यात 9 हजार 615 घरांची विक्री झाली.आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com