मातृभाषेतील शिक्षणाने वाढते आकलनशक्ती - सदानंद थरवळ 

संजीत वायंगणकर
गुरुवार, 12 एप्रिल 2018

डोंबिवली -  विजयनगर, आयरेगाव येथील कल्याण डोंबिवली महापालिकेच्या लाल बहादुर शास्त्री शाळा क्रमांक 21 मध्ये स्थानिक आमदारांनी पाच संगणक संच व चार प्रिंटर अशा साहित्याचे लोकार्पण करण्यात आले.

डोंबिवली -  विजयनगर, आयरेगाव येथील कल्याण डोंबिवली महापालिकेच्या लाल बहादुर शास्त्री शाळा क्रमांक 21 मध्ये स्थानिक आमदारांनी पाच संगणक संच व चार प्रिंटर अशा साहित्याचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी बोलताना प्रतिपादन उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ बोलत होते. पालकांनी आपली मुले इंग्लिश मिडियम मध्येच शिकविण्याचा अट्टाहास सोडला पाहिजे. कारण मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आकलन क्षमता अधिक असते. त्यामुळे ते यशाची उत्तुंग शिखरे गाठून यशस्वी होऊ शकतात. गरीब पालकांना खासगी शाळेतील शिक्षण न परवडणारे असल्याने पालिका शाळांचा दर्जा व स्तर उंचावण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठीच शिवसेना आमदार सुभाष भोईर यांच्या निधीतून संगणक देण्याच्या कामाचे माझ्या हस्ते लोकार्पण होत आहे. याचा मला आनंद होत असल्याचे खरवळ यांनी म्हटले.

उपशहर प्रमुख अरविंद बिरमोळे, विभागप्रमुख अमोल पाटिल, राहुल भगत, प्रविण केणे, रेवणकर हरिश्चंद्र पराडकर, मनोहर भगत आदि पदाधिकारी शिवसैनिक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. 

पहिली ते सातवीची 238 पटसंख्या असलेल्या शाळेतील विद्यार्थी आता संगणक शिक्षण घेऊन स्पर्धेच्या युगात यश मिळवितील असा विश्वास व्यक्त करुन मुख्याध्यापक मोरेश्वर धानवे यांनी आमदार भोईर यांचे आभार व्यक्त केले. येत्या शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीपासूनच विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण देणे शक्य होईल असे प्रविण दलाल यांनी केलेल्या सूत्र संचालनात सांगितले.

Web Title: Mother tongue teaching will Increase perception