'हार्बर' गोंधळप्रकरणी मोटरमनची चौकशी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

मुंबई - दोन दिवसांपूर्वी हार्बर मार्गावर झालेल्या लोकलच्या गोंधळप्रकरणी मोटरमन चौकशीच्या फेऱ्यात अडकला आहे. सिग्नलकडे दुर्लक्ष करून लोकल भलत्याच ट्रॅकवर नेल्याने गर्दीच्या वेळी रेल्वे सेवेचे बारा वाजले. आपत्कालीन ब्रेक यंत्रणा सुरू झाल्याने मोठी दुर्घटना टळल्याचा दावा रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

या मोटरमनला चौकशी पूर्ण होईपर्यंत लोकल चालवावयास दिली जाणार नाही, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. महापालिका निवडणुकीच्या निकालाची धामधूम सुरू असताना गुरुवारी (ता. 23) सायंकाळी हार्बर मार्गावर वडाळा स्थानकाजवळील रावळी कॅम्प सिग्नल चुकविल्याने लोकल खोळंबली. सायंकाळी 7.12 ला ही घटना घडली.

Web Title: motorman inquiry for harbour confussion