अभिजात भाषेच्या दर्जासाठी चळवळ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

मुंबई - मराठीला अभिजात भाषेचा दर्जा अद्याप मिळालेला नाही. ज्ञानभाषा न झाल्यामुळे मराठीची पीछेहाट होत आहे. राज्य सरकारही ठोस व आक्रमक पवित्रा घेताना दिसत नाही. त्यामुळे राज्यभरातील मराठीसाठी काम करणाऱ्या संस्थांनी एकत्र येऊन मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यव्यापी चळवळ उभारण्यात येणार आहे. यासाठी १९ मार्चला पहिली बैठक घेण्यात येईल. 

मराठीच्या मुद्द्यावर आक्रमकपणे काम करण्यासाठी मराठी भाषा संरक्षण विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि न्यायालयात मराठीचा वापर झालाच पाहिजे यासाठी लढा देणारे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. शांताराम दातार यांनी पुढाकार घेतला आहे. मराठी भाषेविषयी प्रेम व आस्था असलेल्यांनी  १९ मार्चला सायंकाळी ५ वाजता डोंबिवली पूर्व येथील मानपाडा रस्त्यावरील जगन्नाथ प्लाझा येथील आगरी युथ फोरमच्या कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.