फुलेंवरील चित्रपटासाठी तज्ज्ञांची समिती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 एप्रिल 2018

मुंबई -  थोर समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवनकार्यावर आधारीत चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य सरकारने तज्ज्ञांची समिती गठित केली आहे. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली आहे. या समितीत सदस्य म्हणून रमेश पतंगे, गिरीश प्रभुणे, सदानंद मोरे, हरी नरके आणि दत्ता भगत यांचा समावेश असून, सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी यासंदर्भातील शासन आदेश जारी केला. राज्य मंत्रिमंडळाने 14 फेब्रुवारी 2018 च्या बैठकीत चित्रपट निर्मिती करण्याचा निर्णय घेतला होता. आता सरकारने समिती गठित करून या समितीवर चित्रपटाची संहिता, पटकथा प्रमाणित करणे, चित्रपटाची निर्मिती ऐतिहासिक सत्याला धरून होत असल्याची खात्री करणे, निर्मिती प्रक्रियेवर देखरेख ठेवणे अशी जबाबदारी सोपविली आहे.
Web Title: movie on mahatma phule technician committee