‘नायर’मधील एमआरआय पुन्हा सुरू 

‘नायर’मधील एमआरआय पुन्हा सुरू 

मुंबई - जानेवारीत मुंबई सेंट्रलमधील पालिकेच्या नायर रुग्णालयातील एमआरआय मशीनला चिकटून ३२ वर्षीय तरुण राजेश मारू याचा मृत्यू झाला होता. त्या दुर्घटनेनंतर बंद ठेवण्यात आलेले मशीन सुरू करण्यात आले आहे. 

ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात रेडिओलॉजी विभागात बाह्यरुग्ण सेवांसाठी एमआरआय मशीन पुन्हा सुरू करण्यात आले. ३१ जुलैला मशीनची तपासणी झाल्यावर १ ऑगस्ट रोजी पहिली चाचणी घेण्यात आली. त्या दिवशी तीनच रुग्णांना सेवा मिळाली. रुग्णालयाच्या अभियांत्रिकी विभागाने हिरवा झेंडा दिल्यावर तब्बल तीन आठवड्यांनी बाह्य रुग्णांसाठी सेवा सुरू करण्यात आली; मात्र रुग्णालय प्रशासनाने त्याबाबत गुप्तता पाळली. 

सध्या सकाळी ८ ते दुपारी ३ अशा पहिल्या सत्रातच रुग्णांना एमआरआय मशीनची सेवा मिळत आहे. राजेशच्या मृत्यूनंतर पालिकेने नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या सूचनेनुसार पहिल्या सत्रातील सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन सेवा सुरू करण्यात आली आहे. इतर दोन सत्रांत एमआरआय सेवा देण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या नेमणुका अद्याप झालेल्या नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली. रुग्णालय प्रशासनाने दुसरे सत्र सुरू करण्यासाठीचे मनुष्यबळ रेडिओलॉजी विभागाला अद्याप पुरवले नाही. दुसऱ्या सत्रातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण कधी मिळणार, अशी चर्चा केली जात आहे. त्याबाबत नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

दीड कोटी खर्च
जानेवारीतील अपघातानंतर एमआरआय मशीनमध्ये मोठा बिघाड झाला होता. मशीनचे बहुतेक भाग बदलावे लागले होते. ते स्वित्झर्लंडमधून मागवावे लागले. त्यासाठी पालिकेला तब्बल ८५ लाखांचा खर्च आला. एकूण मशीनच्या दुरुस्तीसाठी १ कोटी ५६ लाख रुपये मोजावे लागले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com