प्रसिद्ध गायिका मुबारक बेगम यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑगस्ट 2016

मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायिका मुबारक बेगम यांचे सोमवारी (ता. 18) रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. त्या 76 वर्षांच्या होत्या. मंगळवारी (ता. 19) सकाळी जोगेश्‍वरीमधील बेहरामबाग येथे त्यांचा दफनविधी होणार आहे.

मुबारक बेगम यांनी साठच्या दशकातील चित्रपटांचा काळ गाजवला होता. त्यांनी एस. डी. बर्मन, शंकर-जयकिशन आदींसारख्या प्रख्यात संगीतकारांनी संगीतबद्ध केलेली गाणी गायिली. कारकीर्दीतील 178 गाणी त्यांच्या नावावर आहेत. मुबारक बेगम यांचे नाव ऐकताच आजही त्यांची गाजलेली गाणी अनेकांच्या ओठावर येतात. मूळच्या राजस्थानच्या असलेल्या मुबारक अवघ्या 10 वर्षांच्या असताना मुंबईत आल्या. मोठी प्रसिद्धी मिळवलेल्या मुबारक यांना मात्र सरत्या वयात हालाखीचे दिवस काढावे लागले. जोगेश्‍वरीतील बेहरामबाग परिसरात वन वन रूम किचनच्या घरात त्या राहत होत्या. आर्थिक परिस्थिती बेताचीच राहिली. मेमध्ये प्रकृती खालावल्याने त्यांना अंधेरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. राज्य सरकारने त्यांच्या उपचाराचा खर्च उचलला होता. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. सोमवारी रात्री उशिरा त्यांचे निधन झाले.

गाजलेली गाणी
मुझको अपने गले लगाओ... (हमराही), नींद उड जाये तेरी... (जुआरी), वो ना आयेगें पलट के... (देवदास)