मुंबईः मुसळदार पावसात ज्येष्ठा गौरींचे झाले आगमन (व्हिडिओ)

मुंबईः मुसळदार पावसात ज्येष्ठा गौरींचे झाले आगमन
मुंबईः मुसळदार पावसात ज्येष्ठा गौरींचे झाले आगमन

मुंबईः मुंबईत पाऊस धोsधो कोसळतानाच मंगळवारी (ता. 29) सांज वेळी श्री गणेश माता ज्येष्ठा गौरींचे आगमन दक्षिण मुंबईत घरोघरी मोठ्या प्रमाणात झाले. आगरी कोळी, भंडारी, सोनार समाजा बरोबरच अन्य समाजातील गणेश भक्त ज्येष्ठा गौरींचे आगमन करतात. कुलाचारा प्रमाणे कलशाला सजवून त्यात विविध वनस्पतींचे त्यातही खास करुन तेरडयाची मुळासहित ताम्र कलशात पाणी आणि 7 मोठे दगडी खडे घालून स्थापना करतात. तेरडयाची मुळे कपडयात गुंडाळुन बांधतात.

संध्याकाळी 7 वाजता त्याची 5 महीला सुवासिनी ओटी भरतात भारतात. श्रीगणेश मातेची मूर्ति गणेशा पेक्षा 1 इंच उंच असते. नव विवाहित माहेरवासीनी आपल्या पहिल्या गौरी पुजेसाठी सासरहुन खास बंधू बरोबर माहरी येतात. गौरी घरी आणून त्यांना घरात प्रदक्षिणा करवुन त्यांचे पाद्यपूजन, हरिद्रा कुंकु अक्षता वाहून स्थापना करण्यात येते. उमरखाड़ी अरुणोदय निवास येथील सौ. प्रगती प्रभाकर जामसांडेकर यांनी त्यांच्या कुटुंबात स्थापित गौरी मूर्ती पूजना बद्दल दिलेल्या माहिती नुसार, ही गौरीची मूर्ती शिसव जातीच्या काष्ठा पासून निर्मिलेली आहे. अत्यंत सुंदर आणि सजीव दिसणारी कोरीव अशी गौरीची मूर्ती 1986 साली घडविण्यात आली होती. ती वसई येथील सिक्वेरा या ख्रिस्ती बंधूनी घडविलेली असून, गौरीचे दोन्ही नेत्र हे ऑस्ट्रेलिया येथून आणून बसविलेले आहेत. त्यावर शुद्ध चंदनाच्या गाभ्याचा लेप देत चंदन लेपन केलेली आहे. ही संपूर्ण मूर्ति कोरीव आणि देखणी असून चित्ताकर्षक आहे.

गौरीच्या आभूषणांतील सर्व दागिने हे शुद्ध सोन्याचे असून, फारच आकर्षक आहेत. उत्कृष्ट घडनावळीचे आहेत. देवी आवाहन, षोडशोपचार पूजन, महा अभिषेक, नैवेद्य तांबुलम अर्पण करण्यात येते. देवीला दही भात, पाले भाजी आणि धान्यांची म्हणजेच ज्वारी, बाजरी, नाचणी आणि तांदूळ यांच्या एकत्रित पीठा पासून बनविलेली चुलीवर भाजलेली भाकरी असा नैवेद्य असतो. सुपात ओवसा (नारळ, पडवळ, गवार, भोपळा, दूधी, कारले, भेंडी, घोसाळी आणि शिराळे या सात भाज्या 7 पानांत) पूजल्या जातात. काकडी नारळ, साज शृंगार हे सुपात ठेऊन अर्पण पूजन केले जाते. ही गौरी पूजा नवी नवरी तसेच पिढ़यां पिढ्या परंपरागत आपापल्या कुलाचारा प्रमाणे महिलांनी करण्याचा आनंदोत्सव आहे. हा सण जास्तीत जास्त कोकणस्थ कुटुंबात साजरा केला जातो. गौरी आगमण पूजन आणि विसर्जन असा देवीचा दीड दिवसांचा उत्सव गणेश गौरी विसर्जन सोहळयात पूर्णत्वास जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com