पिण्याच्या पाण्याबाबत मुंबईकर बेफिकीर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

मुंबई - मुंबईकर पिण्याच्या पाण्याच्या वापराबाबत बेफिकीर असल्याचा निष्कर्ष हाउसिंग सोसायटी मॅनेजमेंटने केलेल्या सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे. 

मुंबई - मुंबईकर पिण्याच्या पाण्याच्या वापराबाबत बेफिकीर असल्याचा निष्कर्ष हाउसिंग सोसायटी मॅनेजमेंटने केलेल्या सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे. 

मुंबईतील 93 टक्के सोसायट्यांमधील पाण्याच्या टाक्‍या चांगल्या पद्धतीने स्वच्छ करण्यात येत नसल्याचेही या सर्वेक्षणातील निष्कर्ष आहेत. हाउसिंग सोसायटी मॅनेजमेंटच्या माहितीनुसार, मुंबईत 48 हजार नोंदणीकृत हाउसिंग सोसायट्या आहेत. त्यात 1,600 कोटींची उलाढाल होते. पाण्याची टाकी स्वच्छ करण्याची केवळ औपचारिकता करण्यात येते. सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाच्या मदतीने टाकी स्वच्छ करण्यात येते, असेही हे सर्वेक्षण म्हणते. पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी प्रेशर वॉटर जेट पद्धत वापरली जाते, याची माहिती 93 टक्के सोसायट्यांना नाही. पैसे वाचवण्यासाठी सोसायट्या रहिवाशांच्या जिवाशी खेळ करतात, असा निष्कर्ष या सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे. 

सोसायट्यांशी 73 प्रकारच्या सेवा संबंधित आहेत. विद्युत सुरक्षा, प्लम्बिंग यांसारख्या कामासाठीही सोसायट्या कामचलावू पद्धत वापरतात. घरगुती आणि उपयुक्त सेवांसाठीही व्यावसायिक पुरवठादार वापरण्यात येत नाही. नवीन सोसायट्या मात्र अशा सेवा विकसकांकडून इमारत बांधतानाच घेतात, असेही हाउसिंग सोसायटी मॅनेजमेंटच्या वाय. मुकुंद राव यांनी सांगितले. ऑटोमॅटिक पार्किंग सोल्युशन, हाउस किपिंग, हायजिन, पेस्ट कंट्रोल, कचरा व्यवस्थापन ते सोलार- इलेक्‍ट्रिकल जेनसेट दुरुस्ती- देखभालीच्या सेवाही पुरवठा करणारे प्रोफेशनल पुरवठादार असल्याचेही राव यांनी स्पष्ट केले. 

Web Title: Mumbai about drinking water

टॅग्स