विमानतळावर परदेशी चलन जप्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 जून 2018

मुंबई - लाखांच्या परदेशी चलन तस्करीप्रकरणी हवाई गुप्तचर विभागाने सहार विमानतळावर एकास अटक केली; तर दुसऱ्या कारवाईत १९ लाख रुपयांच्या सोने तस्करीप्रकरणी एका महिलेस ताब्यात घेण्यात आले. 

रविवारी पहाटे एआययूचे पथक विमानतळावर गस्त घालत होते. सैफुद्दीन कुलाठील या प्रवाशाच्या बॅगेची झडती घेण्यात आली असता त्याच्या बॅगेतून ४० हजार ५०० यूएस डॉलर, दोन लाख १४ हजार ७८० सौदी रियाल, दोन हजार ७७५ ओमन रियाल, ३७ हजार ६०० दिराम, २५५ दिनार असे परदेशी चलन जप्त केले. जप्त केलेल्या परदेशी चलनाची किंमत ७५ लाख ८५ हजार इतकी आहे. त्याने ब्लॅंकेटमध्ये हे चलन लपवले होते.

Web Title: mumbai airport seized foreign currency