सर्टिफिकेटपुरतीच मुंबई झाली हागणदारी मुक्त!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

मुंबई : मुंबई महानगरी हागणदारी मुक्त (ओपन डेफिकेशन फ्री) झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवार) संध्याकाळी ट्विटरवरून केली खरी मात्र वस्तुस्थिती तशी नसल्याचे दिसत आहे.

'स्वच्छ भारत' अभियानाअंतर्गत मुंबई महानगरपालिकेला हागणदारी मुक्तीचे प्रमाणपत्र मिळाल्याचे ट्विट मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

मुंबईत उघड्यावर शौचाला कोणीही बसत नाही, असा या सर्टिफिकेटचा अर्थ आहे. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांचे अभिनंदनही केले आहे.

या ट्विटनंतर 'सकाळ'ने मुंबईतील काही भागांमध्ये पाहणी केली, तर हागणदारी मुक्ती फक्त सर्टिफिकेटपुरती झाल्याचे दिसून आले.