मुंबईत कुर्ल्यात चार मजली इमारत कोसळली

९ जणांना बाहेर काढण्यात मुंबई अग्निशमन दलाला यश
चार मजली इमारत कोसळली आहे.
चार मजली इमारत कोसळली आहे.sakal

मुंबई :  मुंबईतील कुर्ला येथील नाईक नगर परिसरात चार मजली इमारत कोसळली. काल रात्री 11.30 च्या सुमारास ही घटना घडली असून ढिगाऱ्याखाली ९ जणांना बाहेर काढण्यात मुंबई अग्निशमन दलाला यश आले आहे. सध्या ८ जखमींवर राजावाडी रूग्णालयात उपचार सुरू असून एकाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. जख़मींमध्ये सर्व पुरूषांचा समावेश आहे. जखमी झालेल्यांमध्ये साधारणतः २५ ते ४० वयोगटातील हे पुरूष आहेत. 

मुंबईतील कुर्ला येथील नाईक नगर परिसरात ही चार मजली धोकादायक इमारत होती. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या चारही इमारतींना मुंबई महानगरपालिकेकडून नोटीस दिली होती. तरीही काही लोक तिथे राहत होते. असे असतानाही त्यात 8 ते 10 कुटुंबे राहत होती, सर्व भाडेकरू आहेत.

सुरक्षेसाठी सर्व लोकांना काढून टाकणे हे पहिले प्राधान्य आहे. मंगळवारी सकाळी मिळून लोकांना बाहेर काढले जाईल आणि पाडण्यात येईल. त्यांनी लोकांना आवाहन केले आहे की, जेव्हा जेव्हा बीएमसी नोटीस देईल तेव्हा त्वरीत जागा रिकामी करा, जेणेकरून अशी घटना घडू नये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com