निवडणुकीपुर्वी मुंबई उपनगरातील उड्डाण पुल चकाचक होणार

२०१७ च्या निवडणुकीत उपनगरांमध्ये शिवसेनेला चांगलाच धक्का बसला होता. मुलुंड, अंधेरी पश्‍चिम या शिवसेनेच्या हक्काच्या विभागातून शिवसेनेचा एकही नगरसेवक निवडून आला नव्हता.
shivsena
shivsenasakal
Summary

२०१७ च्या निवडणुकीत उपनगरांमध्ये शिवसेनेला चांगलाच धक्का बसला होता. मुलुंड, अंधेरी पश्‍चिम या शिवसेनेच्या हक्काच्या विभागातून शिवसेनेचा एकही नगरसेवक निवडून आला नव्हता.

मुंबई - आगामी महापालिका निवडणुकीमध्ये (Municipal Election) उपनगरातून तब्बल १७७ नगरसेवक (Corporator) निवडून येणार आहेत. त्यामुळे शिवसेनेने (Shivsena) आता जिल्हा नियोजन समितीच्या निधीमार्फत उपनगरांवर लक्ष केंद्रित केले आहे. शहर विभागातील उड्डाणपुलाखालील (Flyover) परिसरात करण्यात आलेल्या विकासाच्या (Develope) धर्तीवर आता उपनगरातील सहा उड्डाणपुलाखालील परिसरही विकसित करण्यात येणार आहे.

२०१७ च्या निवडणुकीत उपनगरांमध्ये शिवसेनेला चांगलाच धक्का बसला होता. मुलुंड, अंधेरी पश्‍चिम या शिवसेनेच्या हक्काच्या विभागातून शिवसेनेचा एकही नगरसेवक निवडून आला नव्हता. हीच परिस्थिती विलेपार्ले परिसरातदेखील होती, तर शहर विभागातील दक्षिण-मध्य मुंबईत शिवसेनेचे वर्चस्व कायम आहे. आगामी निवडणुकीतही उपनगरांमध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी जिल्हा नियोजन समितीमार्फत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे.

shivsena
मुंबई शहरातील मैलापाणी पर्जन्यवाहिन्यांमध्ये जाणार नाही

उपनगरातील सहा ठिकाणी थीम पार्क तयार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सहा महत्त्वाच्या चौकांचे आणि मार्गाचे आधुनिक पद्धतीने लॅन्डस्केपिंग करण्यात येणार आहे. त्यापाठोपाठ सहा उड्डाणपुलाखालील परिसरदेखील विकसित करण्यात येणार आहे. महापालिकेमार्फत हे काम करण्यात येणार असून त्यासाठी १२ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे; मात्र हा निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत दिला जाणार आहे.

कोणत्या उड्डाणपुलांचा समावेश?

- सुधीर फडके उड्डाणपूल, बोरिवली

- जनरल करिप्पा उड्डाणपूल, बोरिवली

- वीर सावरकर उड्डाणपूल, गोरेगाव

- कॅप्टन गोरे उड्डाणपूल, अंधेरी

- मिलन सबवे उड्डाणपूल, अंधेरी

- घाटकोपर-मानखुर्द जोडरस्ता उड्डाणपूल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com