बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी रियाज सिद्दिकीला चार दिवसांची पॅरोल रजा मंजूर- HC

Mumbai High Court
Mumbai High CourtSakal media

मुंबई : बॉम्बस्फोटाच्या खटल्यात (Bombing case) दोषी ठरलेला आरोपी रियाज अहमद सिद्दिकीला (Riyaz ahmad siddiqui) मुलाच्या निकाहाकरिता हजर राहण्यासाठी चार दिवस पॅरोल रजा (Four days parole granted) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High court) मंजूर केली आहे. सुरक्षेसाठी कारागृह प्रशासनाने निर्धारित केलेला अडीच लाखांचा खर्च रद्द करून ५० हजार रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने सिद्दिकीला दिले आहेत.

Mumbai High Court
उष्म्यामुळे 'किडनी स्टोन' बळावतोय; आठवड्याला ९ ते १० रुग्ण

आरोपीच्या मुलाचा निकाह १२ ते १९ मार्चदरम्यान आहे. सिद्दिकी सध्या पुण्यातील येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. निकाहासाठी पॅरोल सुट्टी मिळावी म्हणून त्याने कारागृह महासंचालकांकडे अर्ज केला होता. तो मंजूर करण्यात आला; परंतु पोलिस सुरक्षेचा प्रचंड खर्च मागण्यात आला. त्यामुळे चार दिवसांची सुट्टी मागण्यात आली. प्रशासनाने ती मान्य केली आणि चार दिवसांसाठी २,५५,५१५ रुपये एवढा खर्च देण्याचे निर्देश दिले.

त्याविरोधात सिद्दिकीने ॲड. फरहाना शाह यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्या. प्रसन्ना वराळे आणि न्या. श्रीराम मोडक यांच्या खंडपीठापुढे त्यावर सुनावणी झाली. सिद्दिकीला पाच मुले असून दोन परदेशात असतात. इथे त्यांचा जुन्या गाड्या विकण्याचा आणि पोल्ट्रीचा व्यवसाय आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती फार चांगली नाही. त्यामुळे खर्चीची रक्कम कमी करावी किंवा माफ करावी, अशी मागणी शाह यांनी केली.

खंडपीठाने याचिकेची दखल घेतली आणि चार दिवस पॅरोल रजा मंजूर केली. तसेच पोलिस सुरक्षेसाठी ५० हजार रुपये जमा करण्याचे आदेश आरोपीला दिले. आरोपीची बॉम्बस्फोट खटल्यातील शिक्षा १० वर्षे होती. बांधकाम व्यावसायिक प्रदीप जैन हत्या खटल्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com