‘युनेस्को’कडून मुंबापुरीचा पुन्हा सन्मान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

मुंबई - दक्षिण मुंबई परिसरातील व्हिक्‍टोरियन गॉथिक पद्धतीच्या वास्तूंचा व कलात्मक वास्तूंचा (आर्ट डेको) समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये झाला आहे. 

मुंबई - दक्षिण मुंबई परिसरातील व्हिक्‍टोरियन गॉथिक पद्धतीच्या वास्तूंचा व कलात्मक वास्तूंचा (आर्ट डेको) समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये झाला आहे. 

‘युनेस्को’च्या जागतिक वारसा समितीच्या बहारिनमधील मनामा येथे झालेल्या ४२ व्या परिषदेत दक्षिण मुंबईतील व्हिक्‍टोरियन गॉथिक व कला वास्तूंचा (आर्ट डेको) समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे राज्यात पाचव्या जागतिक वारसा स्थळाचा समावेश होणार आहे. दक्षिण मुंबईतील मरिन ड्राइव्ह व फोर्ट परिसरात १९ व्या शतकातील व्हिक्‍टोरियन वास्तुशैलींच्या इमारती व २० व्या शतकातील आर्ट डेको शैलीच्या इमारती आहेत. यामध्ये उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ, जुने सचिवालय, राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय, एल्फिन्स्टन महाविद्यालय, डेव्हिड ससून ग्रंथालय, छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय, पश्‍चिम रेल्वे मुख्यालय, महाराष्ट्र पोलिस मुख्यालय, ओव्हल मैदान या व्हिक्‍टोरियन वास्तुशैलीच्या इमारती, तसेच क्रिकेट क्‍लब ऑफ इंडिया, बॅकबे रेक्‍लमेशनची पहिली रांग, दिनशॉ वाछा रोडवरील राम महल, इरॉस व रिगल सिनेमा हॉल, तसेच मरिन ड्राइव्ह येथील पहिल्या रांगेतील इमारती आदी वास्तूंचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत होण्यासाठी नामांकन झाले आहे. 

Web Title: mumbai honoy by unesco