द्रुतगतीवर ‘इंटलिजन्स ट्रॅफिक सिस्टिम’ - एकनाथ शिंदे

यशपाल सोनकांबळे
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

मुंबई - गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातांची संख्या वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर जीवित आणि वित्त हानी कमी होण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या, यावर विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला. अपघात रोखण्यासाठी ‘इंटलिजन्स ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टिम’ कार्यान्वित करणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्‍नाला उत्तर
देताना दिली.

विधान परिषदेचे सदस्य शरद रणपिसे आणि संजय दत्त यांनी हा प्रश्न उपस्थित केला. त्यावर लेखी उत्तर देताना सार्वजनिक बांधकाममंत्री शिंदे म्हणाले, ‘‘द्रुतगती महामार्गांवर १५ व १९ एप्रिल आणि ७ मे ते ३ जून दरम्यान झालेल्या अपघातांमध्ये एकूण १३ जणांचा मृत्यू झाला असून, ११ जण जखमी झाले. अपघातांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते हे वास्तव आहे. ही समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि परिवहन विभागाच्या वतीने ‘इंटलिजन्स ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टिम’ राबविण्यात येणार आहे. त्यामुळे अपघातामध्ये जीवित आणि वाहनांची हानी कमी होईल.’’

तपासणी न केलेल्या स्कूल बसवर कारवाई
पुण्यातील शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या तपासणीचा मुद्दा देखील विधान परिषदेत उपस्थित करण्यात आला. सदस्य अनिल भोसले यांनी याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्याला उत्तर देताना परिवहनमंत्री दिवाकर रावते म्हणाले, ‘‘उन्हाळ्यातील सुट्यांमध्ये विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ३ हजार ६८० बसपैकी २ हजार ५१० बसेसची पुनर्तपासणी केली गेली. त्यामध्ये सुरक्षिततेचे उपाययोजना नसलेल्या, दोषी आढळलेल्या आणि तपासणी न केलेल्या स्कूल बस मालकांविरोधात कारवाई केली जाईल.’