राज्य सहकारी बॅंकेवर आणखी एक प्रशासक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

मुंबई - महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या प्रशासकपदी सरकारने संजय भेंडे यांची नियुक्‍ती केली आहे. बॅंकेवरील प्रशासक मंडळातील ते सहावे सदस्य आहेत. गेल्याच महिन्यात राज्य सरकारने दोन प्रशासकांची नियुक्‍ती केली होती.

जिल्हा बॅंका, नागरी सहकारी बॅंका आणि पतसंस्थांची शिखर बॅंक म्हणून राज्य सहकारी बॅंक काम करते. बॅंकेच्या प्रशासक मंडळाचे डॉ. एम. एल. सुखदेवे अध्यक्ष असून अशोक मगदूम, के. एन. तांबे, विद्याधर अनास्कर आणि अविनाश महागावकर आदी प्रशासक मंडळाचे सदस्य आहेत. प्रशासक मंडळात आता संजय भेंडे यांचाही समावेश करण्यात आला आहे. भेंडे हे नागपूर नागरिक सहकारी बॅंकेचे अध्यक्ष आहेत.

राज्य सहकारी बॅंकेची शुक्रवारी (ता. 4) वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. या वेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात प्रशासक मंडळामध्ये चर्चा होण्याची शक्‍यता आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेत शिखर बॅंकेची महत्त्वाची भूमिका राहणार असून, बुडीत कर्जे, साखर कारखान्यांना देण्यात आलेल्या कर्जांवर चर्चा होईल.