अबु आझमी, वारिस पठाण यांच्या पुतळ्याला भाजप चप्पल मारून निषेध

रविंद्र खरात 
रविवार, 30 जुलै 2017

वंदे मातरम बोलण्यास नकार देणाऱ्या अबू आझमी आणि वारिस पठाण यांच्या पुतळयाला कल्याण पूर्व मध्ये भाजप पदाधिकारी आणि  कार्यकर्त्यांनी चप्पल मारून आपला निषेध व्यक्त केला.

कल्याण : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आणि एम.आय.एम. पक्षाचे आमदार वारीस पठाण यांच्या वंदे मातरम बोलणार नाही, असे विधान करण्याच्या निषेधार्थ आज रविवार (ता. 30 जुलै) कल्याण पूर्वेतील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिकात्मक  पुतळ्याला  चपला मारून  निषेध केला . 

आज रविवार (ता. 30 जुलै) कल्याण पूर्व मध्ये काटेमानवली नाका परिसरामध्ये भाजप कार्यकर्त्यानी जोरदार घोषणा बाजी करत वंदे मातरम बोलणार नाही, असे विधान करणाऱ्या अबू आझमी व वारीस पठाण यांचा निषेध केला. यावेळी त्यांच्या पुतळयाला चपलाने मारत आपला राग व्यक्त करत त्यांच्यावर  देश द्रोहाचा गुन्हा दाखल

करण्याची मागणी कल्याण पूर्व भाजपच्या वतीने करण्यात आला. या आंदोलनामध्ये कल्याण पूर्व भाजपचे नगरसेवक विक्रम तरे, संजय मोरे, संदिप सिंह, परिवहन समिती सदस्य सुभाष म्हस्के, नाना सूर्यंवशी, अनंता पावशे, संदीप तांबे, संतोष शेलार, रवि हराळे, नितेश म्हात्रे, गणेश केदारे, गणेश पगारे, राकेश देशमुख, चेतन म्हात्रे आदींनी सहभाग घेतला होता.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :