मुंबई महापालिका कामगार भरती उमेदवारांची मुख्यमंत्र्यांकडे धाव

mumbaimunicipal
mumbaimunicipal

मुंबई : मुंबई महापालिकेच्या कामगार भरती प्रक्रियेसंबंधी उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे. परिक्षा होऊनही निकाल लागत नसून प्रक्रियेबाबत संभ्रमावस्था निर्माण झाल्याने न्यायासाठी उमेदवारांनी नगरविकास विभागाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. या भरती प्रक्रियेत  सुमारे 1 लाख 6 हजार पात्र उमेदवार अंतिम निकालाच्या प्रतिक्षेत आहे.

मुंबई महापालिकेच्या कामगार भरती प्रक्रियेनुसार परिक्षेसाठी उपस्थित उमेदवारांना त्यांनी सोडवलेली प्रश्नपत्रिका त्यांच्या ई-मेल आयडीवर परिक्षा प्रक्रिया संपताच 2 ते 3 दिवसात पाठवण्यात आली. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या महानगरपालिका भरती प्रक्रियेत अशा पद्धतीने उमेदवाराला माहिती दिली गेली आहे. असे असूनही संबंधित विभाग वजा अधिकारी वर्गाशी काहीही चर्चा न करता आमदार भाई गिरकर, वृत्तवाहिनीने परस्पर भरती प्रक्रियेवर काठिण्य पातळी आणि ऑनलाईन परिक्षा पद्धतीचा ठपका ठेवून भरती प्रक्रियेत अडथळे निर्माण केले आहेत. तरी आपण या विषयी लक्ष घालून आम्हा सर्वांना न्याय द्यावा, अशी विनंती उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

भाजप आमदारांनी चुकिची माहिती दिल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी 1388 जागांसाठीच्या भरतीवर स्थगिती आणण्यासंदर्भात आयुक्तांना लेखी निर्देश दिले आहेत. ते निर्देश मागे घेवून या भरती प्रक्रियेचा अंतिम निकाल जाहिर करावा अशी मागणी उमेदवारांनी नगरविकास विभागाकडे केली आहे.

- महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर दिनांक 11 डिसेंबर 2017 रोजी जाहिरात प्रसिद्ध

- कामगार/कक्ष परिचर/हमाल/आया/स्मशान कामगार/बहुउद्देशीय कामगार इ. पदांसाठी सरळसेवा पद्धतीने 1388 पदांची भरती

- ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले

अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2017 

-  400-800 रुपये परिक्षा शुल्क

- परिक्षा 15 ते 25 फेब्रुवारी 2018 दरम्यान पुर्ण

- एकूण अर्जदारांपैकी 2 लाख 46 हजार विद्यार्थी परिक्षेसाठी हजर

- उमेदवारांना ऑनलाईन परिक्षेत मिळालेल्या गुणांची माहिती २८ फेब्रुवारी 2018 ला देण्यात आली. 

1388 जागांसाठी 1 लाख 6 हजार मुले पात्र असून पारंपरिक पद्धतीनुसार त्यातील 1388 उमेदवार जे उच्च गुणवत्ताधारक आहेत त्यांची अंतिम निवड यादी जाहीर होणे अपेक्षित आहे. परंतु अजूनही त्याबाबत काहीच हालचाल करण्यात येत नसून संबंधित अधिकारी वर्गाने आणि खात्याने तातडीने आपली भूमिका प्रसारमाध्यमांद्वारे स्पष्ट करावी 
- स्नेहल गिरकर, वरळी
उमेदवार मुंबई महापालिका कामगार भरती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com