पेपरफुटीप्रकरणी 10 जणांना कोठडी 

पेपरफुटीप्रकरणी 10 जणांना कोठडी 

मुंबई - "बीएमएस'च्या तिसऱ्या वर्षाच्या ई-कॉमर्स आणि डिजिटल मार्केटिंग विषयाची प्रश्‍नपत्रिका फुटली होती. याप्रकरणी अटकेत असलेल्या 10 जणांना शनिवारी (ता. 18) न्यायालयाने एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. 

अंधेरीतील एका खासगी महाविद्यालयात गुरुवारी (ता. 16) ई-कॉमर्स आणि डिजिटल मार्केटिंगचा पेपर फुटल्याचे उघडकीस आले होते. एका विद्यार्थिनीच्या मोबाईलमध्ये ही प्रश्‍नपत्रिका सापडली. महाविद्यालयाच्या तक्रारीवरून आंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी 10 जणांना अटक केली. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. अटक केलेल्यांपैकी काहींचा सोमवारी (ता. 20) शेवटचा पेपर असल्याने त्यांची जामिनावर सुटका करावी, असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर सर्वांना एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. पेपरफुटीत आर्थिक व्यवहार झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. एका आरोपीने ई-मेलवर प्रश्‍नपत्रिका पाठवली होती. तो ई-मेल किती जणांना फॉरवर्ड करण्यात आला होता, हेही तपासले जाणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com