कर्जतमध्ये बनावट कंपनीद्वारे 1.19 कोटींची फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

नेरळ - एका वर्षात पैसे दुप्पट करण्याचे प्रलोभन दाखवून बनावट कंपनीद्वारे कर्जत तालुक्‍यातील 14 जणांची एक कोटी 19 लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आले आहे. कर्जत पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार करण्यात आली होती. मात्र गुन्हा दाखल होत नसल्याने गुंतवणूकदारांनी रायगड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे धाव घेतली. त्यानंतर कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सोनू वाडकर, महेश झगडे आणि प्रिन्स अग्रवाल अशी आरोपींची नावे असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. 

दक्षिण आफ्रिकेतील कंपनी असल्याचे भासवून ही फसवणूक झाली असल्याचे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाच्या तपासात उघड झाले आहे. सर्वांकडून धनादेशाद्वारे हे पैसे घेतले. सप्टेंबर उजाडला तरी गुंतवणुकीची दुप्पट रक्कम जमा न झाल्याने पवार यांनी तिघांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्वांचे फोन बंद असल्याने अखेर त्यांनी कर्जत पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली. 8 नोव्हेंबरमध्ये आर्थिक गुन्हे विभागाने तक्रार दाखल करून तपास सुरू केला. त्यानंतर कर्जत पोलिस ठाण्यात त्याबद्दल फसवणूक, तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम यांचा आधार घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.