एसटीचे 1269 कर्मचारी आज होणार निवृत्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

मुंबई - राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) एक हजार 269 अधिकारी व कर्मचारी उद्या (ता. 31) निवृत्त होत आहेत. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचारी निवृत्त होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे समजते. त्यांना भविष्य निर्वाह निधीचे (पीएफ) 146 कोटी आणि ग्रॅच्युईटीसाठी 80 कोटी रुपये महामंडळ देणार आहे. या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या जागी काही जणांना बढती देऊन उर्वरित जागांवर भरतीही केली जाईल.