मुंब्र्यात 15 किलो स्फोटके जप्त; तिघांना अटक

श्रीकांत सावंत
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

या प्रकरणातील तीन जणांना पोलिसांनी अटक केली असून याचा तपास ठाणे पोलिसांकडून केला जाणार आहे. ही रसायने कल्याण स्थानकात उतरवून तेथून मुंब्र्यात नेण्यात आली होती. कौसा परिसरात एका गाडीमध्ये ही रसायने आढळून आली आहेत.

ठाणे : आझमगड येथून 15 किलो आरडीएक्स येणार असल्याच्या माहिती आधारे रेल्वे सुरक्षा दल, ठाणे पोलिस आणि दहशतवादी विरोधी पथकाने रविवारी रात्री मुंब्य्रातील कौसा परिसरामध्ये संयुक्त कारवाई केली.

यावेळी पोलिसांना 15 किलो अमोनियम नाट्रेड आणि ९ जिलेटेच्या कांड्या जप्त केल्या. या प्रकरणी आरपीएफचे कल्याणचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक संदिप ओंबासे यांनी शिळ डायघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणातील तीन जणांना पोलिसांनी अटक केली असून याचा तपास ठाणे पोलिसांकडून केला जाणार आहे. ही रसायने कल्याण स्थानकात उतरवून तेथून मुंब्र्यात नेण्यात आली होती. कौसा परिसरात एका गाडीमध्ये ही रसायने आढळून आली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :