18 जुलैला फेरपरीक्षा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

मुंबई - यंदाच्या दहावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 18 जुलैला फेरपरीक्षा देता येईल. या परीक्षेचे ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया 16 जूनपासून सुरू होईल. बारावीसह दहावीच्या विद्यार्थ्यांनाही गुणवत्ता पडताळणीसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. या निर्णयामुळे दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना होईल, असा विश्‍वास मुंबई विभागीय बोर्डाकडून व्यक्त केला. दरम्यान, बारावी गुणवत्ता पडताळणीसाठी चार हजार 83 विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे.