मुंबईः वडाळ्यात 5 वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

मुंबईः वडाळा टीटी येथील खाडी परिसरात पाच वर्षांच्या मुलाचा मृतदेह आज (शुक्रवार) सकाळी सापडला. याप्रकरणी वडाळा टीटी पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तौसिफ नौशाद शेख (वय 5 वर्षे) असे या मुलाचे नाव आहे. सकाळी 9च्या सुमारास मदिना मस्जिदच्या पाठीमागे खाडीत शांतीनगर येथे तो बेशुद्धावस्थेत सापडला. याबाबत नियंत्रण कक्षाला माहिती दिल्यानंतर वडाळा टीटी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तौसिफला पोलिसांनी बाहेर काढून सायन रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून दाखल करण्या पूर्वीच मृत घोषित केले. प्राथमिक अंदाजानुसार या मुलाचा मृत्यू बुडाल्यामुळे झाला असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. हा मुलगा बराच काळापासून बेपत्ता असल्याचेही सूत्रांकडून समजले. त्यानंतर त्याचा शोध घेतला असता तो खाडी किनारी सापडला. याबाबत वडाळा टीटी पोलिस अधिक तपास करत आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :