मुंबईतील तलावांत 97 टक्के पाणीसाठा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

मुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 97 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये रविवार (ता. 3)पर्यंत 14 लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला आहे. चार तलाव ओसंडून वाहत आहेत. मध्य वैतरणा आणि अप्पर वैतरणा ओसंडून वाहण्याच्या मार्गावर आहेत. ही दोन्ही धरणे भरण्यास काही सेंटिमीटर अंतर शिल्लक आहे, असे सूत्रांनी सांगितले.

मुंबईला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी 14 लाख 47 हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा आवश्‍यक आहे. यंदा पावसाने चांगलाच जोर धरल्याने गतवर्षीपेक्षाही अधिक पाणीसाठा जमा झाला आहे. गतवर्षी आजच्या दिवसापर्यंत 13 लाख 73 हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा होता. शहराला पाणीपुरवठा करणारे तानसा, मोडकसागर, तुलसी आणि विहार तलाव ओसंडून वाहू लागले आहेत.

Web Title: mumbai news 97% water storage in mumbai lake

टॅग्स