'आदर्श'च्या बॅंक खात्याबाबत भूमिका मांडण्याचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

मुंबई - कुलाबा येथील आदर्श सोसायटीची गोठवलेली बॅंक खाती खुली करण्याच्या मागणीवर भूमिका मांडण्याचे निर्देश मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने "सीबीआय'ला दिले.

मुंबई - कुलाबा येथील आदर्श सोसायटीची गोठवलेली बॅंक खाती खुली करण्याच्या मागणीवर भूमिका मांडण्याचे निर्देश मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने "सीबीआय'ला दिले.

आदर्श सोसायटीच्या गैरप्रकारात सीबीआयने सोसायटीची बॅंक खाती सील केली आहेत; मात्र सोसायटीच्या देखभालीच्या खर्चासाठी बॅंक खाती खुली करा, अशी मागणी सोसायटीच्या वतीने याचिकेद्वारे न्यायालयाला करण्यात आली होती. यावर आज न्या. जे. चेलमेश्‍वर आणि न्या. एस. अब्दुल नाझीर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. सीबीआयने दोन आठवड्यांत याबाबत बाजू मांडावी, असे निर्देश न्यायालयाने दिले. आदर्श सोसायटीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने नामंजूर केली आहे.