आधार कार्ड मिळणार पोस्टात!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

मुंबई - राज्यातील टपाल कार्यालयांत लवकरच नवीन आधार कार्ड मिळण्याची सोय होणार आहे. राज्यातील एक हजार टपाल कार्यालयांत नवीन कार्ड मिळतील. सध्या शंभर कार्यालयांत आधार कार्डातील माहितीत बदल करण्याची सुविधा आहे.

सध्या नागरिकांना कार्डावरील पत्ता, नाव, मोबाईल क्रमांकात बदल करण्याची सुविधा आहे. जवळच्या आधार अपग्रेडेशन सेंटरमध्ये जाऊन हे करता येते; पण नवीन कार्ड काढण्यासाठी सध्या पायाभूत सुविधा उभारणीचे काम सुरू आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य पोस्टमास्तर जनरल हरीश अग्रवाल यांनी दिली. नवीन आधार कार्ड काढण्यासाठी बायोमेट्रिक उपकरण तसेच कॉम्प्युटर कनेक्‍टिव्हिटी यांसारख्या सुविधा टपाल कार्यालयात असतील. काही महिन्यांत ही सोय केली जाणार आहे. नवीन उपकरणांची खरेदी केली जात आहे. सॉफ्टवेअर घेणे तसेच कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही सुरू आहे. पहिल्या टप्प्यात किमान दोन हजार कार्यालयांत आधार कार्डातील बदल करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. आगामी काळात दुसऱ्या टप्प्यात एक हजार टपाल कार्यालयांत नवीन आधार काढता येईल.