आर्चितला 93 टक्के

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

मुंबई - "किल्ला', "6 गुण' या चित्रपटांतील भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या आर्चित देवधरला दहावीच्या परीक्षेत 93 टक्के गुण मिळाले आहेत. या परीक्षेच्या तयारीसाठी त्याला अवघे दोन महिने मिळाले होते.

मुंबई - "किल्ला', "6 गुण' या चित्रपटांतील भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या आर्चित देवधरला दहावीच्या परीक्षेत 93 टक्के गुण मिळाले आहेत. या परीक्षेच्या तयारीसाठी त्याला अवघे दोन महिने मिळाले होते.

या यशाबाबत तो म्हणाला, 'हे यश माझ्यासाठी खूपच अनपेक्षित होते. सराव परीक्षेत मला चांगले गुण मिळाले होते. आमच्या घरात 90 टक्‍क्‍यांहून अधिक गुण कोणालाही मिळाले नव्हते. त्यामुळे माझे आई-वडीलही खूप खूश आहेत. मी आता पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेणार आहे.''

टॅग्स