अमरसिंह दलाल; त्यांच्यावर ठोकणार 20 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा- अबु आझमी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

आझमींनी अमरसिंह यांना लक्ष्य केले

मुंबई : समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबु आझमी यांनी एकेकाळी समाजवादी पार्टीचे चाणक्य आसलेले अमरसिंह यांच्याविरोधात 20 कोटी रुपयांचा दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे.

अमरसिंह यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कुख्यात डॉन दऊद इब्राहिम याला भारताबाहेर पलायन करण्यस आझमी यांनी मदत केली, असे म्हटले आहे. यावरून आझमींनी अमरसिंह यांना लक्ष्य केले. पत्रकार परिषदेत आझमी यांनी अमर सिंहावर कडाडून हल्ला चढवला.

ते म्हणाले की, "अमरसिंह दलाल आहेत. ते ज्या ज्या पक्षात गेले. तेथे तेथे त्यांनी स्वतःची औकात दाखवली. मात्र, नेताजी म्हणजे मुलायमसिंहावर काय मोहिनी घातली आहे माहीत नाही. तर अशा या नालायक दलालावर मी 20 कोटींचा दाव ठोकत आहे."

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:

टॅग्स