एसी रेल्वेचे भाडे प्रथम श्रेणीएवढे?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

मुंबई - प्रवाशांना प्रतीक्षा असलेल्या वातानुकूलित लोकलचे भाडे सध्याच्या प्रथम दर्जाच्या भाड्याएवढेच ठेवण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव पश्‍चिम रेल्वे प्रशासानाने मुख्यालयाकडे सादर केला आहे. त्यावर लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

वातानुकूलित लोकलने प्रवास करण्याचे मुंबईकर प्रवाशांचे स्वप्न नववर्षाच्या सुरवातीला पूर्ण होणार, अशी घोषणा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आठवड्यापूर्वी केली. दीड वर्षांपासून मुंबईकर वातानुकूलित लोकलच्या प्रतीक्षेत होते. अखेर, ती प्रतीक्षा 1 जानेवारी 2018 रोजी संपणार आहे. या वातानुकूलित लोकलच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्या असून, त्याचा अहवाल रेल्वे मुख्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. सध्या एकच वातानुकूलित लोकल धावणार असल्याने त्याचे भाडे प्रथम श्रेणीइतके असावे, असा प्रस्ताव पश्‍चिम रेल्वेच्या वाणिज्य विभागाने रेल्वे मुख्यालयाकडे पाठवला आहे. मात्र, त्याबाबत अंतिम निर्णय रेल्वे बोर्डाकडून घेण्यात येईल.