दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

जयशंकर व लोकनाथ दुचाकीवरून जात असताना सायन-ट्रॉम्बे रोडवर नर्मदेश्‍वर मंदिरासमोर ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या लोकनाथनचा मृत्यू झाला. निष्काळजीपणे ट्रक चालवल्याचा गुन्हा ट्रकचालकाविरोधात नोंदवण्यात आला असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत

मानखुर्द - चिता कॅम्प परिसरात राहणाऱ्या लोकनाथन नायकर व जयशंकर कन्नन पिल्लई (वय 35) दुचाकीवरून जात असताना त्यांना ट्रकने धडक दिली. या अपघातात लोकनाथचा मृत्यू झाला व जयशंकर पिल्लई यास उपचारानंतर सोडून देण्यात आले.

शनिवारी (ता. 14) दुपारी 12.15 च्या सुमारास जयशंकर व लोकनाथ दुचाकीवरून जात असताना सायन-ट्रॉम्बे रोडवर नर्मदेश्‍वर मंदिरासमोर ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या लोकनाथनचा मृत्यू झाला. निष्काळजीपणे ट्रक चालवल्याचा गुन्हा ट्रकचालकाविरोधात नोंदवण्यात आला असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत.