अभिनेत्री विनयभंगप्रकरणी आरोपीला कोठडी

 अभिनेत्री विनयभंगप्रकरणी आरोपीला कोठडी

मुंबई - विमान प्रवासादरम्यान अल्पवयीन अभिनेत्रीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटकेत असलेला विकास सचदेव याला नऊ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिंडोशी न्यायालयाने बुधवारी दिले. दरम्यान, सचदेवने जामिनासाठी अर्ज केला असून, त्यावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. 

एअर विस्ताराच्या विमानाने दिल्ली-मुंबई प्रवास करताना अल्पवयीन अभिनेत्रीच्या मागील सीटवर बसलेल्या विकासने उजव्या पायाने स्पर्श करून तिच्याशी अश्‍लील वर्तन केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. याप्रकरणी त्या अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट अपलोड केली होती. त्याची गंभीर दखल घेत सहार पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून घेत विकासला रविवारी पोस्को कायद्यांतर्गत अटक केली होती. सोमवारी (ता. 11) त्याला दिंडोशी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 22 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com