'ईडी'ने नोंदवला अख्तर यांचा जबाब

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

मुंबई - सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांचा बुधवारी जबाब नोंदविला. संगीत स्वामित्व हक्काबाबतच्या एका जुन्या वादात जावेद अख्तर तक्रारदार आहेत. या प्रकरणी हा जबाब नोंदवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी अख्तर यांना "ईडी'ने समन्स पाठवले होते. त्यांच्या वतीने प्रतिनिधी पाठवण्यासही मुभा देण्यात आली होती; पण अख्तर यांनी स्वतः उपस्थित राहून आज "ईडी'ला माहिती दिल्याचे समजते. दरम्यान, याबाबत "ईडी'कडून कोणताही अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.