जयंत पाटील यांनी शाहरुखला खडे बोल सुनावले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

मुंबई : ‘असशील तू कोणीही मोठा स्टार, पण संपूर्ण अलिबाग काय तुम्ही खरेदी केलं का?, माझ्या परवानगीशिवाय तू येऊ शकत नाही अलिबागला.’ अशा कडक शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी शाहरुखला सुनावलं.
बॉलिवूडचा किंग शाहरुख खानला शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी त्याच्याच चाहत्यांसमोर खडे बोल सुनावल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शाहरुख खान ३ नोव्हेंबरला आपल्या अलिबागमधल्या फार्म हाऊसवर वाढदिवस साजरा करुन परतत होता. अलिबागहून जेव्हा शाहरुख आपल्या बोटीनं गेट वे इथं आला, त्यावेळी त्याच्या चाहत्यांनी गेट वेवरच मोठी गर्दी केली होती. याचवेळी आमदार जयंत पाटील यांची बोट मुंबईहून अलिबागच्या दिशेनं निघाली होती.

मात्र, शाहरुख खानची बोट पार्क होईपर्यंत जयंत पाटलांना वाट पाहावी लागली. यामुळे जयंत पाटलांचा पारा चांगलाच चढला आणि त्यांनी चाहत्यांसमोरच शाहरुखला सुनावलं.

दरम्यान, जयंत पाटलांचा राग अनावर झाल्यानं शाहरुखने बोटीत बसून राहणंच पसंत केलं. यावेळी त्यानं कोणतंही उत्तर त्यांना दिलं नाही. पाटील आपल्या बोटीकडे निघून गेल्यानंतरच शाहरुख आपल्या बोटीतून बाहेर आला. मात्र, हा संपूर्ण प्रकार तेथील एका चाहत्यानं रेकॉर्ड केला.