अंगणवाडी संपाबाबत पर्यायी व्यवस्थेचा शोध

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

मुंबई - आंगणवाडी सेविकांना मानधनात वाढ करून दिली तसेच वाढीव मागण्यांसाठी चर्चेचे आश्‍वासनही दिले तरी माघार घेतली जात नसल्याने सरकार पर्यायी व्यवस्था उभी करण्याच्या विचारात आहे. गेल्या तीन वर्षांत महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी दोनदा वाढ दिली. ही वाढ मूळ वेतनाच्या 25 टक्‍के जास्त आहे. तरीही अंगणवाडी सेविका समाधानी नसल्याने हे आंदोलन आता सुरू राहील हे गृहित धरून आता पर्यायी व्यवस्था सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे. बालकांना सेवा पुरवण्याचा विचार न करता आंदोलन सुरू ठेवण्याचा मार्ग अयोग्य असल्याचे मत व्यक्‍त केले जाते आहे.