आंबेडकरांमुळेच भारत धर्मनिरपेक्ष- प्रा. आनंद देवडेकर

दिनेश चिलप मराठे
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

प्रा. आनंद देवडेकर म्हणाले, केवळ प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर आदर्शाच्या शोधात असलेल्या प्रत्येकासाठी डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन प्रेरणादायी आहे. 

मुंबई : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही देशी विदेशी विद्यापीठातून उच्च विद्याविभूषित झालेल्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग राष्ट्रनिर्माणासाठी केला. त्यांच्या परिणत प्रज्ञेमुळेच आज राष्ट्रीय ऐक्याचा उदघोष करणारा धर्मनिरपेक्ष भारत उभा आहे, असे प्रतिपादन सद्धम्म पत्रिकेचे संपादक प्रा. आनंद देवडेकर यांनी येथे केले. 

सहकार रात्र शाळा व रात्र कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 'विद्यार्थी दिन' कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्रा. देवडेकर बोलत होते. 

प्रा. आनंद देवडेकर आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, केवळ प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर आदर्शाच्या शोधात असलेल्या प्रत्येकासाठी डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन प्रेरणादायी आहे. 
विद्यार्थ्यांच्या भरगच्च उपस्थितीत पार पडलेल्या या 'विद्यार्थी दिन' कार्यक्रमात काही विद्यार्थ्यांनीही उस्फूर्तपणे भाषणे केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. एस डी. धुमाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री सोनार सर यांनी केले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :