घाटकोपरमधील शाळेला डॉ. कलामांचे नाव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त "इंडिया ऍट 70' हे प्रदर्शनही कलाम यांच्या जन्मदिनी शाळेत भरवण्यात आले. यात भारताच्या वस्तुस्थितीविषयी अल्प माहिती, भारताने जगाला दिलेली साधने, भारताने विकसित राष्ट्र होण्यासाठी काय केले पाहिजे, आधुनिक राष्ट्र घडविणे, भारतातील थोर यशस्वी व्यक्ती आदींची माहिती प्रदर्शनात मांडली

घाटकोपर - मुंबई उपनगरातील साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी (एसआयईएस) माटुंगा या संस्थेशी संलग्न असलेल्या घाटकोपरच्या नॉर्थ मुंबई वेल्फेअर सोसायटी (एनएमडब्ल्यूएस) या शाळेला डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे नाव देण्यात आले. रविवारी (ता. 15) डॉ. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी शाळेतील विद्यार्थ्यांनी सलामी देऊन कलाम यांना मानवंदना दिली. या वेळी शाळेतर्फे डॉ. अब्दुल कलाम यांच्या सहा फुटी पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

कलाम यांनी लिहिलेल्या विविध पुस्तकांचे ग्रंथालय शाळेत सुरू करण्यात आले. रस्ते, शैक्षणिक कार्यक्रम, सूक्ष्मजंतू, बेक्‍टेरियम इस सॉलीबकीलस कलामी यांना कलामांचे नाव देण्यात आले असले तरी एका शाळेला नाव देणारी बहुधा ही एकमेव संस्था असावी, असे एसआयईएस संस्थेचे अध्यक्ष डॉ. व्ही. शंकर यांनी सांगितले. देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त "इंडिया ऍट 70' हे प्रदर्शनही कलाम यांच्या जन्मदिनी शाळेत भरवण्यात आले. यात भारताच्या वस्तुस्थितीविषयी अल्प माहिती, भारताने जगाला दिलेली साधने, भारताने विकसित राष्ट्र होण्यासाठी काय केले पाहिजे, आधुनिक राष्ट्र घडविणे, भारतातील थोर यशस्वी व्यक्ती आदींची माहिती प्रदर्शनात मांडली.