स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींबाबत याचिका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

मुंबई - प्रा. स्वामिनाथन आयोगाच्या शेती आणि शेतकरीविषयक शिफारशी लागू करण्याच्या मागणीबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.

मुंबई - प्रा. स्वामिनाथन आयोगाच्या शेती आणि शेतकरीविषयक शिफारशी लागू करण्याच्या मागणीबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.
सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे. प्रा. स्वामिनाथन यांनी 2004 ते 2006 या कालावधीत शेती आणि शेतकऱ्यांसंबंधी पाच अहवाल दिले. त्यात जमीन, पाणी, हवामान, आर्थिक स्थिती, कर्ज आदींबाबत विविध शिफारशी त्यांनी केल्या आहेत.

शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय धोरण लागू करण्याची महत्त्वाची शिफारसही त्यांनी केली आहे. मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर व न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे रामचंद्र कच्छुवे यांनी आज याचिकेचा उल्लेख केला.

खंडपीठाने पुढील आठवड्यात सुनावणी घेण्याचे निश्‍चित केले. शेतकऱ्यांचा संप सुरू असल्यामुळे तातडीने सुनावणी घेण्याची मागणी याचिकादारांनी केली होती.