आश्‍विनी गोरे बेपत्ताप्रकरणी खडसेंच्या भाच्याची चौकशी 

आश्‍विनी गोरे बेपत्ताप्रकरणी खडसेंच्या भाच्याची चौकशी 

नवी मुंबई - कळंबोलीमधून दीड वर्षापूर्वी पोलिस उपनिरीक्षक आश्‍विनी गोरे-बिंद्रे यांच्या बेपत्ता प्रकरणाला आता नवे वळण लागले आहे. गोरेंच्या बेपत्ताप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे भाचे राजेश पाटील याचे नाव समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच नवी मुंबई पोलिसांनी पाटील यांना जळगावमधून ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असल्याचे पोलिसांकडून समजले आहे. पाटील यांची सलग दोन दिवस पोलिस आयुक्तालयात चौकशी करण्यात आली आहे. पाटील व संशयित आरोपी अभय कुरुंदकर यांचे शेवटचे लोकेशन एकच असल्यामुळे पोलिसांना पाटील यांच्यावर संशय निर्माण झाला आहे. 

2015ला कळंबोली पोलिस ठाण्यात नियुक्त झालेल्या आश्‍विनी गोरे-बिंद्रे यांच्या बेपत्त प्रकरणात आता नवनवीन माहिती समोर येत आहेत. नवी मुंबई पोलिसांनी गोरेंच्या बेपत्ता प्रकरणात केलेला दुर्लक्षपणा गोरेंच्या कुटुंबीयांनी चव्हाट्यावर आणल्यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा चौकशीला सुरवात केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात काही महत्त्वाचे पुरावे हाती लागल्यानंतर अभय कुरुंदकरला मागील आठवड्यात गुरुवारी अटक केली. पोलिसांनी गोरे बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या मोबाईल फोनचे शेवटचे लोकेशन शोधले आहे. गोरे या बेपत्ता झालेल्या दिवसांमध्ये अभय कुरुंदकर व राजेश पाटील यांचे फोनवर सतत संभाषण होत असल्याची माहिती पोलिसांकडे उघड झाली आहे. तसेच याच काळात पाटील जळगावहून कुरुंदकर यांना भेटण्यासाठी मुंबईत आल्याची माहिती समोर आली आहे. गोरे बेपत्ता प्रकरणात काही तांत्रिक बाबीत पाटील यांचा संबंध आल्याने त्यांना चौकशीसाठी बोलवले होते, असे पोलिस उपायुक्त राजेंद्र माने यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com