अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

गर्भपाताच्या परवानगीनंतरही प्रसूतीची वेळ
मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने गर्भपाताची परवानगी दिल्यानंतरही 13 वर्षांच्या बलात्कारपीडित मुलीला बाळाला जन्म द्यावा लागला. मुलीचे वय आणि बाळाची स्थिती लक्षात घेऊन ही प्रसूती करावी लागली, असे जे. जे. रुग्णालयातील डॉक्‍टरांनी शुक्रवारी सांगितले.

गर्भवती राहिलेल्या 13 वर्षांच्या मुलीचे वजन वाढत होते. थायरॉइडचा त्रास झाल्याच्या भीतीने स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ज्ञ डॉ. निखिल दातार यांच्याकडे तिच्यावर उपचार सुरू होते. नंतर मुलगी गर्भवती असल्याचे लक्षात आले. परिसरातील तरुणाने वारंवार केलेल्या बलात्कारातून या मुलीला गर्भ राहिल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. मुलीचे वय पाहता तिच्यावर हे मातृत्व लादणे धोक्‍याचे असल्याने डॉ. निखिल दातार यांनी हे प्रकरण न्यायालयात नेले. मुलीला गर्भपाताची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच गर्भपाताची परवानगी दिली होती.

जे. जे. रुग्णालयाच्या स्त्रीरोग आणि प्रसूती विभागातील डॉ. अशोक आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली नेमलेल्या समितीने सादर केलेल्या वैद्यकीय अहवालानुसार ही परवानगी देण्यात आली होती. मात्र, 31 आठवड्यांच्या गर्भात बाळाचे अवयव तयार होतात. त्यामुळे असा गर्भपात करणे मुलीच्या जिवासाठी धोकादायक ठरले असते. जे. जे. रुग्णालयात आज या मुलीचा गर्भपात करण्याऐवजी प्रसूती करण्यात आली. संबंधित मुलगी लहान असल्याने सिझेरियन पद्धतीने प्रसूती करण्यात आली, अशी माहिती डॉ.आनंद यांनी दिली.