बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांकडून विश्व शांतीसाठी नमाज अदा

दिनेश चिलप मराठे
रविवार, 3 सप्टेंबर 2017

आपल्या भारत देशात सुख समाधान आनंद आणि शांतता नांदावी.मुंबईतील सर्व धर्मियांत बंधुभाव रुजत वृद्धिंगत व्हावा या उदात्त हेतुने सर्व मुस्लिम बांधवानी दक्षिण मुंबईतील विविध प्रार्थना स्थळांत(मशिदीत)नमाज अदा करीत अल्लाह कड़े दुआ मागितली.

मुंबादेवी : इस्लाम धर्माने सांगितलेल्या मानवी मूल्यांमध्ये “त्याग” हे महत्वाचे मूल्य आहे. ईस्लाम धर्मात ही उच्च ध्येय सिध्द करण्यासाठी “कुर्बानी”*किंवा सर्वस्वाचा त्याग करण्याची शिकवण आहे. या त्याग आणि बलिदानाचे प्रतीक म्हणून 'ईद-उल-अजहा' (बकरी ईद) चा सण इस्लाम धर्मियांमध्ये साजरा केला जातो. 

2-3 दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या पावसाच्या आसमानी संकटाला धिरोदात्त पणे तोंड देत माणुसकीचे दर्शन घडवीत मुंबईत सर्व धर्मीय संस्था संघटनांनी पावसात फसलेल्या प्रवाश्यांच्या अन्न आणि निवाऱ्याची सोय करीत सहकार्याचा हात देत मुंबई सदैव आईच्या मायेने सर्वाना सांभाळते असा जगाला अनमोल सन्देश दिला.त्याच मुंबईत आज बकरी ईद हर्षोल्हासात साजरी होताना ईदच्या आनंदाला भेंडी बाजारातील इमारत दुर्घटनेच्या दुःखाची किनार होती.

आपल्या भारत देशात सुख समाधान आनंद आणि शांतता नांदावी.मुंबईतील सर्व धर्मियांत बंधुभाव रुजत वृद्धिंगत व्हावा या उदात्त हेतुने सर्व मुस्लिम बांधवानी दक्षिण मुंबईतील विविध प्रार्थना स्थळांत(मशिदीत)नमाज अदा करीत अल्लाह कड़े दुआ मागितली.

त्याच बरोबर भेंडी बाजार येथील दुर्घटनेट मृत्यु पावलेल्यांच्या आत्म्यास जन्नत नसीब व्हावी म्हणून प्रार्थना केली.भायखळा रेल्वे स्थानक पश्चिम येथील चिस्ती हिंदुस्तानी मस्जिद येथे सकाळी 8:15 ते 9:00वा. ईद ची नमाज अदा करण्यात आली. येथे अंदाजे अंदाजे 1000 ते 1500 लोक नमाजा साठी उपस्थित होते.सर्व कार्यक्रम शांततेत पार पडला.तसेच सीएसटी रेल्वे स्थानक PF No 14 जवळील येथील बाबा बिस्मीला मस्जिद ( दर्गा)येथे ही सकाळी 8:30 ते9:00 वा. ईदची नमाज अदा करण्यात आली. असून अंदाजे 700 ते 800 नमाजी तेथे हजर होते.नमाज पठना नंतर सर्वानी एकमेकांना ईद च्या शुभेच्छा देत आलिंगन दिले.