प्रसिद्ध व्यंग्यचित्रकार बळी लवंगारे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

मुंबई  - ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार बळी लवंगारे (वय 67) यांचे आज कुर्ला येथे त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. लवंगारे यांना लहानपणापासून चित्रकलेची आवड होती. त्यांनी आपल्या कुंचल्याच्या जादूने चार दशकांहून अधिक काळ वाचकांना हसवले आणि अंतर्मुख केले.

दैनिके, पाक्षिके, मासिके; तसेच दिवाळी अंकांमध्ये त्यांनी काढलेली व्यंग्यचित्रे लोकप्रिय ठरली. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी मुंबईतील काही दैनिकांमध्ये व्यंग्यचित्रे काढली. त्यांच्या निधनाने व्यंग्यचित्रविश्वाने एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर कुर्ला येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.