उद्यानातील खेळण्यांवर झाड कोसळले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

बेलापूर - नेरूळ सेक्‍टर २ मधील इंद्रधनुष्य अपार्टमेंट या सोसायटीमधील झाड मंगळवारी (ता. १८) सायंकाळी शेजारच्या संभाजीराजे उद्यानातील खेळण्यांवर कोसळले. त्यामुळे येथील खेळण्यांचे नुकसान झाले. पावसामुळे तेथे मुले नव्हती. त्यामुळे यात कोणालाही इजा झाली नाही. इंद्रधनुष्य अपार्टमेंट सोसायटीभोवती अनेक मोठी झाडे आहेत. सतत पडणाऱ्या पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे यातील एक झाड कोसळले. ते उद्यानातील खेळण्यांवर पडल्याने त्यांचे नुकसान झाले. या घटनेत सोसायटीच्या संरक्षक भिंतीचेही नुकसान झाले आहे.

बेलापूर - नेरूळ सेक्‍टर २ मधील इंद्रधनुष्य अपार्टमेंट या सोसायटीमधील झाड मंगळवारी (ता. १८) सायंकाळी शेजारच्या संभाजीराजे उद्यानातील खेळण्यांवर कोसळले. त्यामुळे येथील खेळण्यांचे नुकसान झाले. पावसामुळे तेथे मुले नव्हती. त्यामुळे यात कोणालाही इजा झाली नाही. इंद्रधनुष्य अपार्टमेंट सोसायटीभोवती अनेक मोठी झाडे आहेत. सतत पडणाऱ्या पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे यातील एक झाड कोसळले. ते उद्यानातील खेळण्यांवर पडल्याने त्यांचे नुकसान झाले. या घटनेत सोसायटीच्या संरक्षक भिंतीचेही नुकसान झाले आहे. झाड मोठे असल्याने आणि उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांचा टॉवर जवळ असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी ते कापून बाजूला केले.

टॅग्स