बेस्टच्या 453 बस लवकरच भंगारात 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

मुंबई - अकार्यक्षम ठरलेल्या "बेस्ट'च्या 550 बस वर्षभरात भंगारात काढल्यानंतर आता 453 बस भंगारात काढण्याचा प्रस्ताव बेस्ट समितीत मंजुरीसाठी आला आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने बस मोठ्या प्रमाणात भंगारात काढून "बेस्ट'ची खासगीकरणाकडे प्रशासनाने वाटचाल सुरू केल्याचा आरोप होऊ लागला आहे. 

संकटात आलेल्या "बेस्ट'च्या ताफ्याचे पुनर्नियोजन करण्यात येणार आहे. प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याने बसमार्ग बंद करण्याचा धडाका सुरू आहे. मात्र, "बेस्ट'ची कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न होत नसल्याचे बेस्ट समिती सदस्यांचे म्हणणे आहे. सध्या बेस्टच्या ताफ्यात तीन हजार 790 बस आहेत. एसी बस गाड्या पूर्णपणे बंद केल्या आहेत. कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि खर्चात बचत करण्यासाठी बस मोडीत काढण्यात येणार आहेत. ताफ्यात तीन हजार 337 बस ठेवण्याचा प्रशासनाचा विचार आहे. 

Web Title: mumbai news best bus