मराठा मोर्चाच्या मार्गावरील बेस्टच्या सर्व फेऱ्या रद्द

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

जे. जे. उड्डाणपुलावरील वाहतूक बंद
मुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या मार्गावरील बेस्टची वाहतूक स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जे. जे. उड्डाणपुलावरील वाहतूक बंद
मुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या मार्गावरील बेस्टची वाहतूक स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, खोदादाद सर्कल ते इस्माईल पी. मर्चंट चौक (नेसबीट जंक्‍शन) दरम्यानचा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे. जे. जे. उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिका छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. संत ज्ञानेश्‍व उड्डाणपुलावरून जाणारी सर्व वाहतूक बंद राहील. ई. एस. पाटणवाला मार्ग, जिजामाता उद्यान जंक्‍शन ते बॅ. नाथ पै मार्ग जंक्‍शनपर्यंत वाहतुकीसाठी दोन्ही दिशांनी बंद राहील. रामभाऊ भोगले मार्ग टी. बी. कदम मार्ग जंक्‍शन ते खामकर चौकादरम्यान बंद राहील. श्रावण यशवंते चौक (काळाचौकी) ते सरदार हॉटेल जंक्‍शनदरम्यानचा दत्ताराम लाड मार्ग दोन्ही दिशांनी बंद राहील. सोफिया झुबेर एकदिशा मार्ग येथून जे. जे. उड्डाणपुलाच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद राहील. महाराणा प्रताप चौक, माझगाव आणि इस्माईल पी. मर्चंट चौक (नेसबीट जंक्‍शन) दरम्यान बळवंत सिंग धोदी मार्ग बंद राहील. लोकमान्य टिळक मार्गावरून बाबूराव शेट्ये चौकातून सीएसटीला जाण्यासाठीचे उजवे वळण बंद राहील. जोहार चौक ते सीएसटीदरम्यान महम्मद अली, माता रमाबाई आंबेडकर मार्ग वाहतुकीसाठी बंद राहील. डी. एन. रोड, महापालिका मार्ग, हजारीमल सोमाणी मार्ग, वालचंद हिराचंद मार्ग हे मार्ग बंद राहतील.