व्यापाऱ्याला लुटण्याच्या तयारीतील दरोडेखोर अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 डिसेंबर 2017

भिवंडी - सुरत येथे खरेदीसाठी आठ लाख रुपये घेऊन निघालेल्या मुस्तफा शेख या गैबीनगरातील कापड व्यापाऱ्याला दरोडा टाकून लुटण्याच्या तयारीत असलेल्या सहा दरोडेखोरांना शांतीनगर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. शादाब ऊर्फ चापड अब्दुल रहेमान अन्सारी (वय 22), अशरफ शेख (वय 22), नौशाद शेख (वय 20), मोहम्मद सोनू मुस्तफा शहा (वय 25), अकबर मोहम्मद शेख (वय 27), जावेद खान (वय 28) अशी अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. ते मूळचे उत्तर प्रदेशातील असून, त्यांनी यापूर्वीही विविध ठिकाणी गुन्हे केले आहेत. 

दरोडेखोरांकडून सहा हजार 500 रुपये किमतीचा गावठी कट्टा, 4 मोबाईल, सुरे, दोरी असा 38 हजार 260 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

Web Title: mumbai news bhiwandi Robber crime