मुंबईत भोजपुरी अभिनेत्रीची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 जून 2017

मृतदेहाची अवस्था पाहता तिने चार दिवसांपूर्वीच आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी डी. एन. नगर पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 
अंजली अंधेरी पश्‍चिमेकडील जुहू लेनमधील परिमल सोसायटीत राहत होती.

मुंबई - भोजपुरी अभिनेत्री अंजली श्रीवास्तव हिने अंधेरीतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सोमवारी उघड झाले. मात्र, या अभिनेत्रीच्या आईने तिने आत्महत्या केली नसल्याचे सांगत चौकशी करण्याची मागणी केली आहे. 

मृतदेहाची अवस्था पाहता तिने चार दिवसांपूर्वीच आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी डी. एन. नगर पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 
अंजली अंधेरी पश्‍चिमेकडील जुहू लेनमधील परिमल सोसायटीत राहत होती. अंजलीचे नातेवाईक तिला दूरध्वनी करत होते. वारंवार फोन करूनही कुणी फोन न उचलल्याने नातेवाईकांना संशय आला. त्यानंतर त्यांनी घरमालकाकडील बनावट चावीने घराचे कुलूप उघडल्यानंतर अंजलीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. 

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेतला. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. अंजलीच्या मृतदेहाशेजारी सुसाईड नोट मिळालेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.