मुंबईच्या किनाऱ्यावर 40 फुटी मृत देवमासा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

मुंबई - मुंबई शहराच्या दक्षिणेला असलेल्या नेव्हीनगर समुद्रकिनारी शनिवारी (ता. 21) चाळीस फुटी मृत देवमासा वाहून आल्याने स्थानिक नागरिक दुर्गंधीने हैराण झाले होते. अखेर या माशाच्या अवशेषांची आज विल्हेवाट लावण्यात आली.

मृत मासा किनाऱ्यावर आल्याची माहिती एका नागरिकाने महापालिकेला दिली; परंतु पालिकेला सुट्टी असल्यामुळे माशाचे अवशेष दोन दिवस किनाऱ्यावर पडून होते. पालिका आणि वनाधिकारी यांनी आज माशाची विल्हेवाट लावली. या माशाच्या डोक्‍याचा भाग 26 फूट होता, तर शेपटीकडील भाग 18 फूट होता. माशाचा डोक्‍याचा भाग कुलाबा पम्पिंग स्टेशनजवळ, तर शेपटीकडचा भाग अफगाण चर्चजवळ होता. विघटनामुळे माशाचे दोन तुकडे झाले असावे, अशी माहिती मरिन इकॉलॉजिस्ट केतकी जोग यांनी दिली.