भाजपच्या नेत्याकडे कोट्यवधींची संपत्ती 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

कल्याण - कल्याणचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा बांधकाम व्यावसायिक मंगेश गायकर आणि त्यांचे भागीदार उमेश तन्ना यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाने छापे घातले. या छाप्यांमध्ये 69 कोटी रुपयांच्या अघोषित संपत्तीबाबत पुरावे हाती लागले असल्याचे समजते. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईला दुजोरा दिला आहे. 

गायकर आणि त्यांचे भागीदार तन्ना यांनी ही संपत्ती आपलीच असल्याचे मान्य केले आहे. त्यांच्याकडून दंडासह करवसुली करण्यात येणार आहे, असे प्राप्तिकर विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. एकाच वेळी 20 ठिकाणी केलेल्या या कारवाईत सुमारे 69 कोटी रुपयांचे जमिनीच्या टीडीआरसंदर्भातील रोख व्यवहार, तसेच फ्लॅटविक्रीसंदर्भातील रोख व्यवहारांचे पुरावे मिळाले आहेत. या संदर्भातील काही व्यवहारांच्या नोंदी तपासण्याचे काम सुरू आहे.